Anant Chaturdashi Wishes In Marathi | अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा :
Anant Chaturdashi Wishes In Marathi | अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा
आपुले येणे, आपुले जाणे,
त्यामधले क्षणभंगुर हे जगणे….
जगण्याचाच या उत्सव करावा….
अन् रोजचं तो मनी बसवावा
अनंत चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा
आभाळ भरले होते तुम्ही येताना
आता डोळे भरलेत पाहून तुम्हाला जातांना
अनंत चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा!

बाप्पा तुझा हात सदैव
आमच्या माथी असू दे,
तुझी साथ जन्मोजन्मी
पाठीशी असू दे,
आनंद येऊ दे घरी,
प्रत्येक कामात यश मिळू दे..
गणपती बाप्पा मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या..!
अनंत चतुर्दशी निमित्त हार्दिक शुभेच्छा..!
Also Read : 100+ Ganpati Visarjan Quotes In Marathi | बाप्पा विसर्जन कोट्स
आली अनंत चतुर्दशी मनात हुरहूर !
देव बाप्पा आपल्या गावी जातोय दाटले दुःख सर्वदूर !
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!

बाप्पा
माझ्या जीवनातील सगळ्या माणसांना
उदंड आयुष्य लाभू देत,
त्यांच्यावर सदैव तुझी कृपादृष्टी राहू देत
हीच तुझ्या चरणी प्रार्थना
गणपती बाप्पा मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या…!
अनंत चतुर्दशी निमित्त हार्दिक शुभेच्छा..!
रिकामं झालं घर, रिता झाला मखर
पुढल्या वर्षी लवकर येण्यास
निघाला लंबोदर
अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा

तुझ्या येण्यान गणराया
घर माझं आनंदात नाहून जातं
अनंत चतुर्दशी चा निरोप तुला देतांना
मन माझं भरून येतं
अनंत चतुर्दशीच्या सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा
गणेश विसर्जनाच्या दिवशी मंगलमूर्ती
तुमच्या आयुष्यातील सारी दु:ख, वेदना
घेऊन जावो! हीच आमची कामना
गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या
अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा
Also Read : 100+ Navratri Wishes In Marathi | नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
सुख समृद्धीसाठी प्रार्थना माझी तुझ्या चरणी,
हात जोडूनी क्षमा मागतो कळत नकळत झालेल्या चुकांची,
भजन गाणी आम्ही गाऊ, ढोल ताश्यात पुन्हा तुला आणू,
मोदक करंज्या खायला ये, खेळ खेळू आणि जल्लोष करू
अनंत चतुर्दशीच्या सर्वांना शुभेच्छा…

निरोप घेताना देवा आम्हास आज्ञा असावी
चुकले आमचे काही तर क्षमा करावी
आभाळ भरले होते तुम्ही येताना
आता डोळे भरलेत पाहून तुम्हाला जातांना
अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा
डोळ्यात आले अश्रू
बाप्पा आम्हाला नका विसरु,
आनंदमय करुन चालले तुम्ही
पुढल्या वर्षी आम्ही तुमची वाट पाहू
गणपती बाप्पा मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या…!
अनंत चतुर्दशी निमित्त सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा..!”

आज ६ सप्टेंबर रोजी भाद्रपद चतुर्दशी म्हणजेच अनंत चतुर्दशी आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती घरात आणला जातो आणि अनंत चतुर्दशीला निरोप दिला जातो. श्रीगणेशाचा आशीर्वाद प्राप्त व्हावा आणि जीवनात समृद्धी ही राहावी अशी प्रार्थना बाप्पा चरणी करून, “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” असा गणपती बाप्पास निरोप द्या.
निरोप घेताना देवा आम्हास आज्ञा असावी
चुकले आमचे काही तर क्षमा करावी
अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा !