15 August Speech In Marathi | स्वातंत्र्य दिन भाषण
15 August Speech In Marathi | स्वातंत्र्य दिन भाषण : प्रिय मित्रांनो खालील लेखात आम्ही आपल्यासोबत स्वतंत्र दिनाचे 15 ऑगस्ट चे भाषण मराठी शेअर केले आहे. आम्ही आशा करतो की हे Independence Day Speech in Marathi आपणास उपयोगाचे ठरेल . आपण 15 august speech in marathi बद्दलचे आपले विचार कमेन्ट करून नक्की सांगा. आणि जर भाषणात काही चूक अथवा दुरुस्ती असेल तर ते देखील कळवा. धन्यवाद..
15 August Bhashan Marathi (250) Words| स्वातंत्र्य दिन भाषण मराठी
आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी, प्रिन्सिपल, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ. तुम्हा सर्वांना स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मला या स्वतंत्र दिनी दोन शब्द बोलण्याची संधी मिळाली या बद्दल मी आभारी आहे. स्वतंत्र दिन सर्वच भारतीयांसाठी महत्त्वाचा उत्सव आहे. या दिवशी सर्व भारतीय संघर्ष आणि विद्रोह करून स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या महान स्वतंत्र सैनिक आणि नेत्याची आठवण करतात. भारताचा स्वतंत्र दिवस फक्त ब्रिटिश शासना पासून देशाला स्वातंत्र्याची आठवण करून देत नाही, तर हा दिवस देशाची शक्ती देखील जगासमोर दाखवतो. आणि संपूर्ण देशाची एकता जगासमोर मांडतो.
जवळपास 200 वर्षापर्यंत भारतावर राज्य केल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 ला आपला देश स्वतंत्र झाला. इंग्रजांचे अत्याचार सोसून कितीतरी स्वतंत्र सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. तेव्हा कुठे आपण स्वतंत्र झालो. आजच्या या शुभ दिवशी आपल्या देशाचे पंतप्रधान देशाची राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर देशाचा ध्वज फडकावून भाषण देतात. या दिवशी स्वतंत्र लढ्यात सामील नेत्यांना श्रद्धांजली वाहिली जाते.
आपला देश दिन प्रतिदिन पुढे जात आहे. व लवकरच आपण एक महासत्ता म्हणून जगासमोर उभे राहू. भारताच्या स्वातंत्र्याच्या चार वर्षानंतर आपल्या देशाने राज्यघटना लागू केली. आपल्या राज्यघटनेने देशाला अधिक सक्षम केले. आज आपण जगातील सर्वात मोठी विविधता असलेली लोकशाही आहोत. कृषी क्षेत्रापासून तर औद्योगिकी करणापर्यन्त आपण जगातील मोजक्या प्रगत देशाच्या पंक्तीत आहोत. व सतत आपला देश प्रगतीपथावर पुढे जात आहे.
ज्या पद्धतीने आपण आज देशाच्या महान नेत्यांना आठवण करतो, त्याच पद्धतीने आपण आपल्या महान सैनिकांना न विसरता त्यांनाही धन्यवाद द्यायला हवे. आपल्या देशाचे महान सैनिक दिवस रात्र सीमेवर उभी राहतात. त्यांचे बलिदान लक्षात घेऊन आपण एकजूटतेने देशासाठी कार्य करायला हवे.
आजचे माझे भाषण येवढ्या शांत चित्ताने तुम्ही ऐकुन घेतले त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. सर्वांना स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद जय भारत
धन्यवाद…
Also Read : Independence Day Wishes In Marathi | स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
15 ऑगस्ट फक्त 1 मिनिटाचे भाषण – 15 th August Speech In Marathi
- सर्वांना माझा नमस्कार.
- माझे नाव स्वप्नील आहे.
- आज १५ ऑगस्ट आहे
- प्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्या !
- १५ ऑगस्ट हा एक राष्ट्रीय सण आहे.
- या दिवशी आपला भारत स्वतंत्र झाला.
- हा दिवस आपण आनंदाने साजरा करतो.
- अनेक सैनिक देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले.
- आपला भारत देश महान आहे.
- मला माझा देश खूप खूप आवडतो.
- जय हिंद,वंदे मातरम् !
15 August Bhashan Marathi PDF – 15 ऑगस्ट भाषण PDF
तिरंगा आमुचा मान आहे..
पराक्रमाचे गान आहे !
तिरंगा आमुचा प्राण आहे..
भारताची शान आहे !
सर्वांना माझा नमस्कार.
माझे नाव स्वप्नील आहे.
आज १५ ऑगस्ट ! आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्या !
आजचा हा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप आनंदाचा, सन्मानाचा व अभिमानाचा आहे.
मित्रहो,१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले.
आज आपण स्वतंत्र भारतात मुक्तपणे शॉवस घेतोय ते आपल्या वीरांच्या बलिदाना मुळेच. त्या शूरवीरांना, क्रांतीकारकांना माझा सलाम !
आपला भारत देश हा विविधतेत एकता असलेला अगळा वेगळा देश आहे. आपल्या भारताने विविध क्षेत्रात खूप प्रगती केली आहे.
आपण सर्वांनी आपल्या देशाची एकता व अखंडता ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
तिरंगा झेंडा फडकतो,
सारे जयजयकार बोला !
१५ ऑगस्ट अभिमानाचा,
अपूला देश स्वतंत्र झाला !
जय हिंद ! जय भारत !
|| धन्यवाद ||
Also Read : गणेश चतुर्थी माहिती | Ganesh Chaturthi Information In Marathi
15 ऑगस्ट सोपे भाषण मराठी – independence day speech in marathi
आदरणीय प्राचार्य, शिक्षक वर्ग आणि येथे उपस्थित असलेले सर्व पाहुणे तसेच माझ्या सर्व प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो सर्वप्रथम, माझ्याकडून तुम्हा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या भरपूर शुभेच्छा. आज देशाचा ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत. यंदा ‘विकसित भारत’ या थिमवर आपला देशा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे.
भारताच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस फार महत्वाचा आहे . २०० वर्षांच्या गुलामगिरीतून भारताला सोडवण्यासाठी अनेक देशप्रेमींनी आपल्या प्राणांची आहूती दिली आहे. स्वातंत्र्य लढ्यात अनेक क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिकांनी काम केलंय.
या सर्वच क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे. आजच्या दिवशी सर्व भारतीय नागरिकांनी स्वातंत्र्यसैनिकांना नतमस्तक होत आदरांजली वाहिली पाहिजे. तसेच स्वातंत्र्यदिनी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकावतात. यावेळी ३१ तोफांची सलामी देखील दिली जाते. लष्कराच्या तुकड्यांकडूनही सलामी दिली जाते. हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. भाषण संपवताना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
जय हिंद ! जय भारत !
|| धन्यवाद ||