Anant Chaturdashi Vrat Katha PDF | अनंत चतुर्दशी : अनंत चतुर्दशी म्हणजे फक्त दहा दिवस ठेवलेल्या गणपतीच्या विसर्जनाचा दिवस, एवढंच बहुतेकांना माहीत असतं. पण हि गोष्ट इतक्यावरच थांबत नाही. हिंदू धर्मामध्ये अनेक व्रतं आणि विधी आहेत, त्यातलंच हे एक महत्त्वाचं व्रत आहे. आणि या व्रतामागे एक खूप जुनी आणि रंजक अशी पौराणिक कथाही देखील जोडली गेली आहे.
भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्दशी तिथी ०६ सप्टेंबर रोजी पहाटे ०३:१२ वाजता सुरू होईल. त्याच वेळी, भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्दशी तिथी ०७ सप्टेंबर रोजी पहाटे ०१:४१ वाजता संपेल. अशा प्रकारे, अनंत चतुर्दशी ०६ सप्टेंबर रोजी साजरी केली जाईल.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी सुकर्मा आणि रवि योग तयार होत आहेत. यासोबतच धनिष्ठा आणि शतभिषा नक्षत्राचाही संयोग असेल. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशी तिथीला पूजेचा शुभ मुहूर्त दिवसभर असतो. साधक त्यांच्या सोयीच्या वेळी लक्ष्मी नारायण जीची पूजा करतात. या दिवशी पूजेचा सर्वोत्तम वेळ ०७ सप्टेंबर रोजी सकाळी ०५:२१ ते ०१:४१ पर्यंत आहे.
Also Read : 100+ Ganpati Quotes In Marathi – गणपती बाप्पा कोट्स मराठी
Anant Chaturdashi Vrat Katha | अनंत चतुर्दशी व्रत कथा

कौरव पांडवांमध्ये जेव्हा द्युत खेळत होते तेव्हा सर्व संपत्ती हारले होते. त्यांना बारा वर्षांचा वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास स्वीकारावा लागला होता. तेव्हा श्रीकृष्णाने पांडवांना वनसात भेट देऊन संकटातून मुक्त होण्यासाठी अनंत चतुर्दशीचे व्रत करण्यास सांगितले होते. खरं तर श्रीकृष्णाने या व्रताची एक कथी सांगितली होती.
सुमंतू नामक एक ब्राम्हण होता. त्याला एक शीला नावाची कन्या होती. मुलीच्या जन्मानंतर आईचा मृत्यू झाला. त्यामुळे सुमंतू ब्राम्हणाने पुन्हा लग्न केले. पण दुसरी पत्नी कजाग, भांडखोर होती. नंतर काही दिवसांनी शालाचे लग्न कौंडिण्यमुनीबरोबर झाले, लग्नानंतर ती सासरी जाण्यास निघाली तेव्हा सुमंतूने पत्नीकडे शीलाला काही वस्तू आंदण म्हणून देण्याची इच्छा व्यक्त केली. पण त्याच्या पत्नीने काहीही न देण्यास सांगतिले. उलट जवाई आणि मुलीचा अपमान केला. त्यामुळे शीला खुप दु: खी झाली. ती सासरी जाण्यास निघाली. जाताना तिला काही महिला नदी किनारी पूजा करताना दिसल्या. ते अनंताचे व्रत होते. तिनेही मनोभावे व्रत केला.
व्रतात सांगितल्याप्रमाणे तिने स्वत:च्या हाता अनंताचा दोरा बांधला. नंतर ती सासरी आली. त्या व्रतामुळे संसारात समृद्धी आली. कौंडिण्यमुनीला या अचानकपणे प्राप्त झालेल्या प्रगतीचा गर्व झाला. त्यांनी शीलाच्या हातातील अनंत धागा काढून जाळून टाकला. नंतर अनंत त्याच्यावर कोप पावला. मिळालेले यश निघून गेले आणि पुन्हा दारिद्र्याचे दिवस आले.
Also Read : गणेश चतुर्थी माहिती | Ganesh Chaturthi Information In Marathi
शीलाने पतीला त्याची चूक समजावून सांगितली. कौंडिण्यमुनीला व्रताचे महत्व समजले. नंतर ते वनात गेले आणि अनंताचे व्रत करण्याचे ठरवले. तेव्हा अनंताने म्हणजेच भगवान विष्णूने ब्राम्हरूपात दर्शन दिले. अनंत चतुर्दशीचे व्रत करायला सांगतिले. त्यांनी तसे केले. नंतर वैभव प्राप्त झाले. कौंडिण्यमुनीला जसे वैभव प्राप्त झाले तसे पांडवांना प्राप्त व्हावे यासाठी श्रीकृष्णाने युधिष्ठिराही वनवासात असताना अनंत व्रत करण्यास सांगितले. पांडवांनी तसेच केले आणि त्यांनी चांगले फळ मिळाले.