Hartalika Katha Marathi | हरतालिकेची आरती,पूजा,कथा

Hartalika Katha Marathi : भारतातील सण हे श्रद्धा, परंपरा आणि स्त्री शक्तीचे भावपूर्ण अभिव्यक्ती आहेत. यापैकी, हरतालिका तीज हा एक खोल आध्यात्मिक प्रसंग म्हणून चमकतो, जो देशभरातील महिला अत्यंत भक्तीने साजरा करतात. या उत्सवातील एक मध्यवर्ती घटक म्हणजे हरतालिका आरती (Hartalika Aarti Marathi) , देवी पार्वतीच्या स्तुतीत गायली जाणारी एक भक्तिगीत.

तुम्ही व्रत पाळत असाल किंवा विधी आणि परंपरांबद्दल उत्सुक असाल, हे मार्गदर्शक तुम्हाला हरतालिका तीज आरती , तिचे महत्त्व आणि ती घरी कशी करावी याबद्दल जाणून घेण्यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट देते.

Hartalika Aarti Marathi​ | हरतालिकेची आरती

जय देवी हरितालिके।
सखी पार्वती अंबिके।
आरती ओवाळीतें।
ज्ञानदीपकळिके।। धृ.।।

हरअर्धांगी वससी।
जासी यज्ञा माहेरासी।
तेथें अपमान पावसी।
यज्ञकुंडींत गुप्त होसी। जय. ।।1।।

जय देवी हरितालिके।
सखी पार्वती अंबिके।
आरती ओवाळीतें।
ज्ञानदीपकळिके।।

रिघसी हिमाद्रीच्या पोटी।
कन्या होसी तू गोमटी।
उग्र तपश्चर्या मोठी।
आचरसी उठाउठी ।।जय. ।।2।।
जय देवी हरितालिके।
सखी पार्वती अंबिके।
आरती ओवाळीतें।
ज्ञानदीपकळिके।।

तापपंचाग्निसाधनें।
धूम्रपानें अधोवदनें।
केली बहु उपोषणें।
शंभु भ्रताराकारणें। ।।जय.।।3।।
जय देवी हरितालिके।
सखी पार्वती अंबिके। आरती ओवाळीतें।
ज्ञानदीपकळिके।।

लीला दाखविसी दृष्टी।
हें व्रत करिसी लोकांसाठी।
पुन्हां वरिसी धूर्जटी।
मज रक्षावें संकटीं।। जय.।। 4।।
जय देवी हरितालिके।
सखी पार्वती अंबिके।
आरती ओवाळीतें।
ज्ञानदीपकळिके।।

काय वर्ण तव गुण।
अल्पमति नारायण।
मातें दाखवीं चरण।
चुकवावें जन्म मरण। जय. देवी।।5।।
जय देवी हरितालिके।
सखी पार्वती अंबिके।
आरती ओवाळीतें।
ज्ञानदीपकळिके।।

Hartalika Aarti Marathi Audio | हरतालिकेची आरती MP3

Hartalika Puja Marathi | हरतालिकेची पूजा

हरतालिका तीज व्रताची आरती तुमच्या घराच्या आरामात साधेपणा आणि भक्तीने करता येते.

  1. पूजा क्षेत्र तयार करा (hartalika puja marathi)
    • जागा पूर्णपणे स्वच्छ करा आणि ताजी फुले, रांगोळी आणि दिव्यांनी सजवा.
    • भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या मूर्ती किंवा चित्रे लावा.
  2. धार्मिक विधींच्या वस्तू अर्पण करा
    • फळे, मिठाई, सुपारी, हळद आणि शेंदूर द्या.
    • अगरबत्ती आणि दिवे पेटवा.
  3. व्रतकथा सांगा (hartalika katha in marathi​)
    • देवी पार्वतीच्या तपश्चर्येची आणि दिव्य विवाहाची कथा वाचा.
  4. आरती गा.
    • पारंपारिक मराठी आवृत्ती वापरा किंवा हरतालिका आरतीचे तुमचे प्रादेशिक रूपांतर वापरा .
    • प्रामाणिकपणे गा, एकट्याने किंवा गटात.
  5. प्रसाद वाटा.
    • सर्व उपस्थित भक्तांसोबत प्रसाद वाटून विधी संपवा.

Hartalika Katha Marathi | ​हरतालिकेची कथा

Hartalika vrat katha in marathi : हरितालिका व्रत केल्यानंतर कथा सांगितली जाते. ही कहाणी आहे शिव-पार्वती यांची, ही कथा वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर व्रत पूर्ण होते असे ही सांगितले जाते. तुम्हीसुद्धा हरितालिकेचे व्रत केल्यानंतर कथा नक्की वाचा.

Hartalika Katha Marathi | हरतालिकेची आरती,पूजा,कथा
Hartalika Katha Marathi | हरतालिकेची आरती,पूजा,कथा

एके दिवशी शंकरपार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीनं शंकराला विचारलं, महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणते? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा. मी कोणत्या पुण्याईनं आपले पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रांत चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वांत श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस, ते व्रत ऐक.

हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस. चौसष्ट वर्षं तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दु:ख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दु:ख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी? अशी ‍त्याला चिंता पडली. इतक्यात तिथं नारदमुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहेत ती विष्णूला द्यावी, तो तिचा योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुजकडे मागणी करण्यास पाठविलं आहे म्हणून इथं मी आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यांने ही गोष्ट कबूल केली.

नंतर नारद तेथून विष्णूकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या बापानं ही गोष्ट तुला सांगितली, ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं, तेव्हा तू सांगितलंस, महादेवावाचून मला दुसरा पती करायचा नाही, असा माझा निश्चय आहे, असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे, ह्याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपास केलास.

तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतिये चा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हाललं. नंतर मी तिथं आलो, तुला दर्शन दिलं. आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणाली, तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाही! नंतर ती गोष्ट मी मान्य केली. मी गुप्त झालो.

पुढे दुसर्‍या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस. इतक्यात तुझा बाप तिथं आला: त्यांन तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व हकीकत सांगितलीस. पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिका व्रत असं म्हणतात. याचा विधी असा आहे.

ज्या ठिकाणी हे व्रत करावयाचं असेल, त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं. पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं. षोडशोपचारांनी त्याची पूजा करावी, मनोभावे त्याची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो. साता जन्मांचं पातक नाहीसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर सात जन्म वंध्या होतात. दळिद्रं येतं व पुत्रशोक होतो. कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ति वाण द्यावं. दुसरे दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं. ही साठ उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाब्राह्मणांचे द्वारी, गाईचे गोठी, पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top